युवकांच्या कल्याणार्थ प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव संघटना | व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक

माहीती:-

संत वांड्मय प्रसारक मंडळ, कराड ही “ना नफा ना तोटा” या तत्वावर प्रकाशन करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. संस्थेने आपल्या दोन तपांच्या वाटचालीमध्ये आपल्या “ना नफा ना तोटा” या तत्वाची कास न सोडता खऱ्या अर्थाने संत वांड्मयाची सेवा केली आहे. आजपर्यंत संस्थेने केलेल्या प्रकाशनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:- वारकरी नित्यनेम भजनी मालिका – १३०००० प्रती, संत तुकाराम महाराज गाथा (पारायण प्रत) – ८३००० प्रती, बायबलसाईझ गाथा – १३००० प्रती, ज्ञानेश्वरी (पारायण प्रत) – ३२००० प्रती, बायबलसाईझ ज्ञानेश्वरी – ८००० प्रती, पॉकेट भजनी मालिका – १८००० प्रती, सदाचार मकरंद – १४००० प्रती संत एकनाथ महाराजकृत भागवत - ७००० प्रती, संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ – ६०००० प्रती, भगवदगीता – २००० प्रती, रोजनिशी – ३०००० प्रती, नाटाचे अभंग – १०००० प्रती, ज्ञानेश्वरी (९ व १२) अध्याय – ५००० प्रती इ. यावरून संस्थेची प्रकाशने किती लोकप्रिय व लोकाभिमुख आहेत हे लक्षात येते. यामागील मुख्य कारण; निर्दोष छपाई, उत्तम कागद, उत्तम बायडिंग व योग्य किंमत हेच आहे. एवढया प्रदीर्घ काळानंतरही संस्थेची शिल्लक रक्कम म्हणून एक रुपयापर्यंतही शिल्लक संस्थेकडे उपलब्ध नाही हेच त्याचे प्रत्यंतर आहे. श्री. भारत महाराज भोसले हे संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेने आता नव्या पिढीकडे सेवेची जबाबदारी देणेचे पाउल उचलले आहे. तरुण मुलांनी एक संघ तयार करून ही जबाबदारी घ्यावी अशी कार्यकारिणीची इच्छा आहे. यानंतर संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज यांची गाथा प्रकाशन करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याचप्रमाणे श्री. ज्ञानेश्वरी व तुकोबारायांची गाथा सार्थ करणेचाही संकल्प आहे. या सेवेमध्ये कोणास अंशात्मक जबाबदारी स्वीकारावयाची असेल तर सबंधित व्यक्तींनी संस्थेकडे संपर्क करावा.



प्रकाशने:-

वारकरी नित्यनेम भजनी मालिका, संत तुकाराम महाराज गाथा (पारायण प्रत), बायबलसाईझ गाथा, ज्ञानेश्वरी (पारायण प्रत) , बायबलसाईझ ज्ञानेश्वरी, पॉकेट भजनी मालिका, सदाचार मकरंद, संत एकनाथ महाराजकृत भागवत, संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ, भगवदगीता, रोजनिशी, नाटाचे अभंग, ज्ञानेश्वरी (९ व १२) अध्याय



आमची प्रकाशने मिळण्याची ठिकाणे:-

१. श्री. मारूतीबोवा कराडकर मठ, झेंडे गल्ली, पंढरपूर.

२. श्री. मारूतीबोवा कराडकर मठ, चाकण रोड आळंदी.

३. श्री. मारुतीबोवा कराडकर मठ, गुरुवार पेठ, कराड.

४. वैष्णव सदन, कोपर्डे हवेली, कराड.

टीप:- आमची प्रकाशने वरील ठिकाणीच मिळतात. कोणाही पुस्तक विक्रेत्याकडे आम्ही विक्रीस देत नाही, याची नोंद घ्यावी व छापील किंमतीपेक्षा जास्त पैसै घेतल्यास तक्रार करावी.



संपर्क :-

ह.भ.प. सुभाष पाटील

मो. ९७६३५६८५३६