युवकांच्या कल्याणार्थ प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव संघटना | व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक

भारतीय कृषीव्यवस्था ही स्वयंपुर्ण व स्वावलंबी नागरी संरचनेचा प्रमुख आधार होती. भारतीय शेतकरी हा गोवंशपालन, गोवंशरक्षण व गोवंशसंवर्धन या त्रिसुत्रीचा अंगीकार करून आत्मनिर्भर होता तसेच गोमातेचे / भारतीय गायीच्या शेण, गोमुत्राद्वारे विविध खते व औषध निर्माण करून, कौंटुबिक व सामाजिक आरोग्य यांतील गोमातेचे महत्त्व जाणून सेवाभावाने गोपालन करणारा होतो. प्राचीन ऋषींनीसुद्धा गुरुकुल शिक्षणप्रणालीमध्ये गोसेवेचा अंतर्भाव केलेची कित्येक उदाहरणे देतां येतील. पुर्वी राजाच्या संपन्नतेचा भाग म्हणून त्याच्याकडील गोधन हा सर्वमान्य निकष होता. परंतु मागील सहस्रकामध्ये मुघल व ब्रिटिश आक्रमकांनी सत्ता हस्तगत करून गोमातेच्या पालनावर व संवर्धनावर अनेक आघात केले त्याचीच परिणीती म्हणून भारतीय शेती व शेतकरी उत्तरोत्तर परावलंबी होण्यात झाली व म्हणून भारतीय शेतीमध्ये रासायनिक खताच्या व औषधांच्या वापरास सुरुवात झाली. आज सर्व विश्वामध्ये आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत व समाज परत नैसर्गिक व आध्यात्मिक शेतीकडे वळताना दिसत आहे. या सर्वामागे जे प्रामणिक व अथक प्रयत्न ज्या काही व्यक्तींनी व सामाजिक संस्थांनी केले यामध्ये कराड तालुका वारकरी संघ संचलित श्रीकृष्ण गोपालन व संशोधन केंद्र करवडी या संस्थेचे महत्वपुर्ण योगदान आहे.या संस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकरी गोपालनास प्रवृत्त झाले असून काही साधकांनी या गोपालनापासून प्रेरणा घेऊन स्वत: गोशाळांची स्थापना केलेली आहे व गुरूवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन कित्येकजण संस्थेच्या गोग्रास योजनेअंतर्गत गोसेवेमध्ये सहभाग घेत आहेत. तसेच परिसरातील कित्येक शेतकरी चार्याच्या दानाचे रुपाने या सेवाकार्यामध्ये सहभाग घेत आहेत. यावरोबरच या संस्थेद्वारा घाण्याचे सेंद्रिय करडी तेल, शेंगदाणा तेल, पेंड तसेच सेंद्रिय मुग, तुर हरभरा, उडीद इ. सर्व प्रकारच्या दाळी, कडधान्य, गुळ, धुर, श्रेणी, गोमूत्र, शेण, गांडूळ खत व देशी गायीचे तुप इ. योग्य दरामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहे.


संपर्क :- विजय आलेकर भ्रमणभाष - ९९६०६६६०५८