प्रश्न - उत्तरे

1) राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये प्रवेश कधी घ्यावा ?
विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या सुरुवातीसच साधारणपणे जून महिन्यात प्रवेश देण्यात येतो. गुरुकुलमध्ये इ. ५ ते १० पर्यंतचे शालेय शिक्षण देण्यात येते.


2) राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये विध्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते?
• राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक आणि व्यावसायिक शिक्षण दिले जाते. • सदरच्या दिल्या जाणाऱ्या अध्यात्मिक शिक्षणामध्ये पखवाज वादन, हार्मोनियम वादन, संस्कृत गीता पठण, हरिपाठ इ. शिकवले जाते. • व्यावसायिक शिक्षणामध्ये पंचगव्य चिकित्सा प्रशिक्षण ज्यामध्ये गायींच्या मल, गोमूत्र, दुध दही तूप इ. वापर करून औषधे, धूप, उदबत्ती, साबण यांची निर्मिती करणे तसेच सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे आणि तेलघाण्याचा वापर करून शुद्ध देशी तेलनिर्मिती करण्याचे शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते.


3) राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये विध्यार्थ्यांना किती रुपये फी आहे?
आपल्या राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांकडून साधारणपणे एकूण वार्षिक फी रक्कम रुपये २५०००/- फक्त घेतली जाते, या असणाऱ्या फी मध्ये विध्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, न्याहारी, सायंकाळी देशी गायींचे दुध आणि संपूर्ण निवासाची सोय केली जाते.


4) राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये असणारे इतर सुविधा आणि उपक्रम कोणते?
आपल्या राष्ट्र्बंधू राजीवजी दीक्षित गुरुकुलमध्ये वार्षिक २ शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात आणि व्यसनमुक्त युवक संघाच्या दरवर्षी मे महिन्यामध्ये होणार्या किल्ले दर्शन अर्थात वार्षिक संस्कार सोहळ्यात विध्यार्थ्यांना सहभागी केले जाते.